कळत नकळत

बराहा-मराठीत लेखन करण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय!

Posted on: ऑगस्ट 20, 2009

इंटरनेटवर मराठी साइट्स उघडल्या की सर्वात पहिला प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे नेमकं हे वेबसाइटवाले मराठीत लिहीतात तरी कसे….? इंटरनेटवर मराठीत लेखन (किंवा देवनागरी लीपीत) लेखन करणं, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाला नेहमी भेडसावत असतो. तसे इतरही अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मराठीत लेखन करण्यासाठी, जे मी माझ्या ’मी मराठी…!’ या वेबसाइटवर दिलेले आहेत (ते बघण्यासाठी इथे क्लिक करा.)

पण हे पर्याय वापरायला जरा अवघडच जातात, तेव्हा आता नेमकं मराठीत लेखन कसं करावं हा प्रश्न जसाच्या तसा राहतो. इंटरनेटवर असणारे बहुतेक मराठी लोक ’बराहा’ हे सॉफ्टवेअर वापरतात. हे सॉफ्टवेअर वापरायला इतके सुलभ आहे, की जसे आपण मध्ये टाइप करतो (उदा. baba) ते लगेच (बाबा) अशाप्रकारे मराठीत उमटते. असे मराठी फॉन्ट्स सुद्धा उपलब्ध आहेत (उदा. शिवाजी), पण ते युनिकोड(UTF-8) मध्ये उपलब्ध नाहीत, याचा अर्थ आपण ते इंटरनेटवर वापरू शकत नाही. पण बराहा हे सॉफ्टवेअर आपल्या मायक्रोसॉफ्टच्या सीस्टीम मध्ये इनबिल्ट असणारा ’मंगल’ हा ट्रुटाइप फॉन्ट युज करते, सो डोण्ट गेट टेन्स्डऽऽऽऽऽऽ……!!!

’बराहा’ डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. (size: 1.74MB)

हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला ’बराहा नोटपॅड’ आणि ’बराहा IME’ असे दोन आप्लिकेशन्स मिळतील. बराहा IME द्वारे आपल्याला हवी असलेली भारतीय भाषा निवडता येईल (उदा. मराठी) आणि नंतर आपण कुठेही, इंटरनेटवर कमेंट्स करण्यासाठी, आपल्या कॉम्प्युटरच्या फाइल्स आणि फोल्डर्स रीनेम करण्यासाठी इत्यादी याचा उपयोग करू शकता, अगदी मोफत!!!

शेवटी याखाली कमेंट्स पण मराठीत करा……………….!!!!

-विशाल तेलंग्रे

Bookmark and Share

19 प्रतिसाद to "बराहा-मराठीत लेखन करण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय!"

Can we have a hindi or english translation of the psot?

ही पध्दत वापरून सध्या माझे लेखन सुरू केले आहे. त्याचबरोबर काही महत्वाचे कुलवृत्तांताचे लेखन केले.

देवनागरी टंकलेखनासाठी श्री.विशाल तेलंग्रे अणि श्री.फडनिस म्हणतात त्याप्रमाणे बराहा युनिकोड२.० ही ,सध्यातरी, सर्वोत्तम प्रणाली आहे.त्यातील संभाव्य सर्व अडचणीविषयी श्री.विशाल यांनी उत्साहाने आणि आनंदाने अगदी अचूक लिहिले आहे.ते लक्षपूर्वक वाचावे. थोड्याशा सरावाने मराठी टंकलेखन सहज जमते. कारण ते उच्चारानुवर्ती आहे(फोनेटिक).मात्र लिहिलेले पुन: वाचावे. एखादा शब्द चुकला तर तो अचूक येईपर्यंत पुन:पुन्हा प्रयत्‍न करावा. एकदा जमू लागले की मग लिहायला मजा येते.
श्री.विशाल यांना मी सुचवू इच्छितो की ज्यांची मातृभाषा मराठी आहे आणि ज्यांच्यापाशी स्वीय संगणक (पी.सी) आहे अशा त्यांच्या सर्व नातेवाईकांना,मित्रमैत्रिणींना, परिचितांना संगणकावर मराठी लिहिण्यास उद्युक्त करावे.

बराहाबद्दल अजून एक शंका: ऑर्कुटमधील ऑ येतो, पण ऍक्शन, ऍक्ट, ऍटम हे काही आपण असं लिहित नाही…

विवेक जी, बराहा हे देवनागरी स्क्रिप्ट मध्ये लिहिण्यासाठी सध्यातरी अत्युत्तम ह्या बाबतीमुळेच म्हणता येणार नाही… आपल्याला अ वर अर्धा चंद्र देण्याची सवय आहे, पण बराहा ने आतापर्यंत तरी ती सुविधा पुरवलेली नाहिये, अजुनही ते “ऍ” अशाप्रकारेच टाईप करण्याची सुविधा देते. बघुयात, ते फिक्स करतात की नाही त्यासाठी..

“गमभन” ही एक ऑफलाईन मराठी लिहिण्याची सुविधा आहे, त्यामध्ये तुम्हाला हवं असलेलं वैशिष्ट्य मिळेल.

आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक आभार!

Got the answer.. क‍र्हाड etc…

thanks!

Hi.

In Baraha, karhaaD and kurhaaD are giving the following results:
कर्हाड कुर्हाड
But you know we don’t write like this.

तर्हा तर्हेवाईक are some more cases.

Please help.

आणि हो, एक गोष्ट विसरलोच होतो..
ती म्हणजे कोणत्याही शब्दावर अर्धचंद्रानुस्वार (नुक्ता ?) देण्यासाठी:

~M

ह्याचा वापर बराहाचा उपयोग करून करावा.

वापरासाठी काही उदाहरणे:

अँजेल – a~Mjela
हूँ – hoo~M
सँडल- s~MDala
पाँडेचेरी – paa~MDecheree

आणखी काही अडचण आलीस तर बिनधास्त विचारा..! 🙂

sorry Vishlya…mi tujhi aadhichi comment wachli aahe…tari punha re nahi kelas tar chalel…

dhyanenshwarmadhala dhnya Baraha madhe kasa lihila jato??

अगं, ज्ञानेश्वर मधला ‘ज्ञ’ लिहिण्यासाठी बराहाचा वापर करून j~j असे टाईप केले तर ‘ज्ञ’ असे उमटते… 😛

Namaskar,
Mi load kele te Baraha. Pn tyat Shatkonacha sh va da kasa lihava te kahi jamat nahiye,

Kahi gaiud karta yeil ka 2mhala?

नक्कीच, मी मदत करण्यासाठीच बसलोय इथे…! 😉
बरं “ष” टाईप करण्यासाठी “Sh” असे टाईप करावे.. आणि “ड” साठी “Da” सोप्पं आहे राव..!
आणखी काही अवघड शब्द:

महाराष्ट्र – maharaaShTra
ज्ञानेश्वर – j~jaaneshvara
क्षत्रिय – kShatriya
मराठी – maraThee
आनंद – aanaMda
खर्‍या – khar^yaa
तुमच्यासाठी – tumachyaasaaThee
छावा – Chaavaa
पाणी – paaNee

आशा आहे की, या शब्दांमुळे तुमच्या बर्‍याचशा अडचणी दूर झाल्या असतील…

आणि तुम्ही बराहाची हेल्प (F1 दाबल्यानंतर उघडते) वाचल्यानंतर, तुम्हाला बरेचशी नविन माहिती मिळेल, आणि काही अडचण आलीच तर मी आहेच इथे…! 🙂

आभार!

Very Very Thank you

प्रतिक्रियबद्दल धन्यवाद प्रतिकजी, छान आहे ना बराहा…

Why you have stopped posting New Posts?Please start new way

गेली दीड दोन वर्ष तरी बरहा वापरतोच आहे…

>>> प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
>>> मी पण गेल्या महिनाभरापासून बराहा युज करतोय, मस्त आहे, आता अगदी बिनफिकीर आहे मराठीत लिहिन्याबद्दल!

यावर आपले मत नोंदवा

नवीन संकेतस्थळ

लेखकाचे नवीन संकेतस्थळ आपण खालील पत्त्यावर पाहू शकता:
http://vishaltelangre.com/

कळत नकळत वरील पृष्ठे

आर्काईव्ह्ज

हीट काउंटर!

  • 33,607 वेळा ही अनुदिनी पाहिली गेली!

किती जण लाइनवर आहेत…

ब्लॉग विश्व !

मी येथे आहे…!

येथेही जरूर भेट द्या:

Page copy protected against web site content infringement by Copyscape