कळत नकळत

इंटरनेटवर मराठी साइट्स उघडल्या की सर्वात पहिला प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे नेमकं हे वेबसाइटवाले मराठीत लिहीतात तरी कसे….? इंटरनेटवर मराठीत लेखन (किंवा देवनागरी लीपीत) लेखन करणं, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाला नेहमी भेडसावत असतो. तसे इतरही अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मराठीत लेखन करण्यासाठी, जे मी माझ्या ’मी मराठी…!’ या वेबसाइटवर दिलेले आहेत (ते बघण्यासाठी इथे क्लिक करा.)

पण हे पर्याय वापरायला जरा अवघडच जातात, तेव्हा आता नेमकं मराठीत लेखन कसं करावं हा प्रश्न जसाच्या तसा राहतो. इंटरनेटवर असणारे बहुतेक मराठी लोक ’बराहा’ हे सॉफ्टवेअर वापरतात. हे सॉफ्टवेअर वापरायला इतके सुलभ आहे, की जसे आपण मध्ये टाइप करतो (उदा. baba) ते लगेच (बाबा) अशाप्रकारे मराठीत उमटते. असे मराठी फॉन्ट्स सुद्धा उपलब्ध आहेत (उदा. शिवाजी), पण ते युनिकोड(UTF-8) मध्ये उपलब्ध नाहीत, याचा अर्थ आपण ते इंटरनेटवर वापरू शकत नाही. पण बराहा हे सॉफ्टवेअर आपल्या मायक्रोसॉफ्टच्या सीस्टीम मध्ये इनबिल्ट असणारा ’मंगल’ हा ट्रुटाइप फॉन्ट युज करते, सो डोण्ट गेट टेन्स्डऽऽऽऽऽऽ……!!!

’बराहा’ डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. (size: 1.74MB)

हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला ’बराहा नोटपॅड’ आणि ’बराहा IME’ असे दोन आप्लिकेशन्स मिळतील. बराहा IME द्वारे आपल्याला हवी असलेली भारतीय भाषा निवडता येईल (उदा. मराठी) आणि नंतर आपण कुठेही, इंटरनेटवर कमेंट्स करण्यासाठी, आपल्या कॉम्प्युटरच्या फाइल्स आणि फोल्डर्स रीनेम करण्यासाठी इत्यादी याचा उपयोग करू शकता, अगदी मोफत!!!

शेवटी याखाली कमेंट्स पण मराठीत करा……………….!!!!

-विशाल तेलंग्रे

Bookmark and Share

Advertisements

Pioneer ग्रुपचे असोसिएटिव्ह एडिटर आणि जर्नलिस्ट अशी त्यांच्या ट्विटर प्रोफाइलवर बायोग्राफी दिलेली आहे… कांचन गुप्ता त्यांचे नाव… ट्विटरवर आमच्यात झालेली आजची चर्चा मी खाली जशीच्या-तशी देतोय, त्यावर तुमचे मत मात्र अवश्य नोंदवा…

माझा ट्विटर आयडी: suruwat आहे, कांचन गुप्तांचा: KanchanGupta आहे…

चर्चा खालीलप्रमाणे:

कांचन गुप्ता: I support the lifting of the ban on James Laine’s book on Shivaji. Now let’s lift the ban on all books, including Satanic Verses. What say?

मी: @kanchangupta, Why you support the lifting of the ban on James Laine’s Book on #Shivaji? Are you knew the real history of Shivaji in #India?

कांचन गुप्ता: @suruwat No book, barring anything dealing with child pornography, should be banned.

मी: @kanchangupta, Then if I wrote a book on MK Gandhi with a violated content and using fake instances, then it must not have to be banned, eh?

कांचन गुप्ता: [उत्तर नाही]

मी: @KanchanGupta Then why MF Hussain’s paintings had been banned, tell the reason?

कांचन गुप्ता: @suruwat They have not been banned.

मी: @KanchanGupta Oh, I thought, they had been banned due to instigation of people! 😮

मी: @KanchanGupta Then you’re against the restrictions with such a violating and sense instigator books and films, right?

कांचन गुप्ता: @suruwat Yes, I am against censorship.

मी: @KanchanGupta Then I’ve question to you, if you support the prev thing, then you indirectly supports the speech by Raj Thackeray, right?

मी: @KanchanGupta ’cause he also gave speech w/ such a violated content which been good for #Marathi people but hurts north-side people…

कांचन गुप्ता: [उत्तर नाही]

मी: @KanchanGupta If you’re against censorship, then my prev que, should you support If I wrote a book on Gandhi w/ violated content?

कांचन गुप्ता: [उत्तर नाही]

मी: @KanchanGupta I’m talking such a things, ’cause I’m one, who hurt by the disgusting words used by Laine w/ our Shivaji maharaj! 😦

मी: @KanchanGupta There is none other issue which make us separated, I love you and my all Indian bro/sis’!

मी: @KanchanGupta Sorry, if you find any HARD words I’ve used while talking with you! Thanks… Have a nice time ahead! 🙂

कांचन गुप्ता: @suruwat To uphold freedom of speech does not mean to endorse what is being said. Please learn basics and then debate.

मी: @KanchanGupta I never mean to be against freedom of speech, just wanted to resolve few doubts of mine!

मी: @KanchanGupta Okay,but many sentences in James Laine’s book hurts us, u knw if tune through StarMajha, IBNLokmat etc #Marathi news channels

मी: @KanchanGupta I know you haven’t read the history of#Maharashtra and nor the book of Laine, then while being un-knowledgeably why you[…]

मी: @KanchanGupta […]support the lifting of ban on such a disgusting book? Our regional news channels are supporting the BAN on that BOOK!

मी: @KanchanGupta And moreover, we hate our state govt. as they not presented the firm evidences in Supreme court,everyone here is against them

कांचन गुप्ता: @suruwat You are being aggressive. I support lifting the ban on all books. I oppose censorship. And I don’t care who feels hurt. Bye.

मी: @KanchanGupta Look sir, I’m not making any aggressive sentence & nor tweeted you, I’m a engineering student…

मी: @KanchanGupta You’re a JOURNALIST of our country, and IF YOU MAKE ANY STATEMENT, THEN YOU MUST NEED TO ANSWER PEOPLE ON THAT, am I correct?

कांचन गुप्ता: [उत्तर नाही]

मी: I just talked with @KanchanGupta, associative editor of Pioneer, and he’s saying, “I don’t care who feels hurt.” How disgusting?? Shame!!!

imabnash: @suruwat kis topic pe baat kiya?

मी: @iamabnash You have to read the full conversation between me and @KanchanGupta since a bit hours ago! I’ve a right to discuss with him, eh?

citizentalks: @KanchanGupta no public figure like you can’t let it go that way, you have to explain wy u suport it? do u knw is it rght or wrng? @suruwat

मी: @citizentalks The question is to me, which you’ve asked a bit ago or to @KanchanGupta? Confused! 😦

citizentalks: @suruwat kanchan gupta

मी: @citizentalks अगदी बरोबर, ते जे म्हणतील, तेच खरे व तेच सगळ्यांनी मान्य करावे अशी त्यांची समजूत झालेली दिसतेय… @KanchanGupta (I respect u)

कांचन गुप्ता: @suruwat Shame on you for misquoting me. Pls quote in full. Or don’t at all. Bye.

मी: @KanchanGupta Hello sir, please keep control on your language and also keep in mind, that you are a journalist, you’re talking aggressively!

मी: @KanchanGupta Due to your disgusting statement, you’re indirectly narrowing the valley between us, eh? Pls read basic ideology of respecting

मी: “RT: @ibnlokmatashish: @suruwat we are all against the book” -> @KanchanGupta

कांचन गुप्ता: [अजुनही उत्तर नाही]

इतरही अनेक जण त्यांच्याशी बोलत होते, पण जसे काही आपण कुठलेतरी “दादा” आहोत, असा त्यांचा एकूण भाव (व्यक्तिमत्व) मी अनुभवलं… या चर्चेबद्दल तुम्हा लोकांच्या चांगल्या, वाईट, विरोधी, टिका/प्रतिक्रिया जरूर नोंदवा… शिवाय जेम्स लेनच्या “Shivaji – The Hindu King In Islamic India” पुस्तकावरील सर्वोच्च न्यायालयाने उठवलेल्या बंदीबाबतही तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल!

धन्यवाद!

कविश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘मराठी भाषा दिवस’ पाळण्याची प्रथा आहे. त्यांना विनम्र अभिवादन करून सर्व मराठी प्रेमींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शाहरूख आणि बाळासाहेबांची मिटिंग स्वागतार्ह…. बैठकीनंतर शाहरूख माफी मागेल अशी आशा आहे!

कित्येक दिवसांपासून चालू असलेली “कोप टू होप” अश्या प्रकारची जाहीरात बहुतेक जणांनी टिव्हीवर पाहिली असेल. पहिले-पहिले तर मला या जाहिरातीचा नेमका अर्थच कळत नव्हता. पण एकदा १५ दिवसांपूर्वी सहजच याहू वरील न्युज वाचत होतो, तेव्हा कुठे मला कळालं की नेमकं काय प्रकरण आहे ते…

तुम्हाला मालदीवने समुद्रामध्ये तर नेपाळने माउंट एव्हरेस्टवर घेतलेली कॅबिनेटची बैठक आठवत असेल ना… हं, त्याच्याशीच या प्रकरणाचा संबंध आहे… आपण प्रत्येकजण दहावीपर्यंतच्या शैक्षणिक वर्षांमध्ये हरितगृह परिणाम, ग्लोबल वार्मिंग यासारखे विषय शिकलेलो आहोतच… पण त्याचा कधीच खोलात जाऊन अभ्यास केला नसणार, हं काही निसर्गप्रेमींना वगळून बरं… तुम्हाला माहिती आहे का, १९व्या शतकाच्या शेवटच्या दशकांत जेव्हा वाफेवरच चालणारे पहिले इंजिन तयार केले गेले होते, त्याचापासून निघालेल्या धूरातील कार्बनचे अस्तित्व आजही पृथ्वीच्या वातावरणात आहे! याचा सरळ-सरळ अर्थ तर असाच होतो ना की, औद्योगिक क्रांतीला जेव्हापासून सुरूवात झाली होती, त्यामुळे झालेल्या वायू प्रदुषणाचे दुष्परिणाम आज आपण भोगतो आहोत.. तर मग आज आपण ज्या २०व्या शतकात जगतोय, आपण केलेले प्रदुषण १९व्या शतकाच्या तुलनेने कितीतरी अधिक पटीने जास्तआहे, त्याचा येत्या काही वर्षांत, म्हणजेच सन २०२० पर्यंत काय परिणाम होईल, याचा कोणी विचार केला का…??

कोपनहेगेन (त्यासंबंधित ऑफिशियल वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.) मध्ये ७ ते १८ डिसेंबर या कालावधीत संयुक्त राष्ट्र संघटनेने (’युनो’ने) “जागतिक हवामान बदल” या महत्वाच्या मु्द्यावर एक चर्चासत्र आयोजित केलेले आहे, आज दिनांक १७ डिसेंबर, अन उद्या या चर्चासत्राचा शेवटचा दिवस.. गेल्या दोन आठवड्यांमध्ये या चर्चेत १०० ते १५० राष्ट्रे सहभागी झाली. पण दुसर्‍या महायुद्धाबद्दल कोणाला माहीती आहे का? जी राष्ट्रे जित (आय मीन पराजित) झालेली आहेत, आणि जी पारतंत्र्यात आहेत किंवा कर्जबाजारी झालेली आहेत, अशा राष्ट्रांनी, त्यावेळी मित्र राष्ट्रांनी म्हणजेच जेत्यांनी तयार केलेल्या “संयुक्त राष्ट्रे” या जागतिक दर्जाच्या संघटनेत सामिल व्हावे, व जेते मंडळी जे काय निर्णय घेतील ते त्या राष्ट्रांनी निमूटपणे मान्य करावेत… त्यावेळी सर्वात महत्वाची गोष्ट होती म्हणजे की दोस्त राष्ट्र पक्षातील एकही राष्ट्र त्यावेळी या संयुक्त राष्ट्र संघटनेत सामील नव्हते…!! ही आहे  या “संयुक्त राष्ट्र ” संघटनेची ऐतिहासिक पार्श्चभूमी… आज तरी ती राष्ट्रे या संघटनेची सदस्ये आहेत का नाही, एवढंच मला फक्त माहित नाहिये… यावरून आपल्याला एवढं तर निश्चितच कळलं असेल की “युनो” ही अमेरिका आणि इतर दोस्त राष्ट्रे किंवा “बड्या” राष्ट्रांच्या हातातील एक बाहूली आहे, ज्याद्वारेच त्यांनी आपल्यासारख्यांना लूबाडून स्वतःला विकसित बनवून घेतले आहे, आणि आपण शेवटपर्यंत असंच विकसनशील रहावं हा त्यांचा मानस असावा. म्हणूनच काय मला बहुतेक वाटतंय की देशावर ज्या घाता-पाताच्या घटना वाढताहेत, त्यामागे नक्कीच त्यांचाच हात असावा. सबळ कारणही तसेच आहे, त्यांच्याएवढा फायदा ना पाकिस्तानला होणारा आहे ना की दुसर्‍या एखाद्या राष्ट्राला….??? अन मी मध्यंतरी असं देखील ऐकलं होतं की, आताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी “ओसामा बीन लादेन ” याने १९६०-७० दरम्यान अमेरिका आणि रशिया ह्या दोन बड्या महासत्ताध्ये चाललेल्या शीत-यु्द्धामध्ये अमेरिकेला मदत केली होती म्हणून…!! विचार करण्यासारखी गोष्ट आहे…!!

आता जी कोपनहेगेनला कॉन्फरन्स चालू आहे, ती निष्फळ होणं, हे तर साहजिक आहेच.. बड्या राष्ट्रांचा दबाव, त्यांनी केलेल्या गुप्त करारामुळे होणारी छोट्या राष्ट्रांची गोची अशी बरीच उघड कारणे आहेत.. बाय दि वे, आपण ह्या गोष्टींपासून काही तरी बोध नक्कीच घ्यायला हवा..

आर्यभट्टाने पृथ्वी गोल आहे असं सांगणार्‍या कोपर्निकसच्या (माझ्या माहितीप्रमाणे, पश्चिमेत ही गोष्ट प्रथम “आरिस्टार्कस” या खगोलवैज्ञानिकाने सांगितली होती, पण त्याचं कुठं नाव देखील ऐकण्यात येत नाही, जा द्या, हे मॅटर या पोस्टशी निगाडित नाही, मी चुकीने जरा खोलात शिरलो होतो… 😉 ) जन्माच्या अगोदरच ती गोष्ट सांगितली होती, त्या गोष्टीचा आपण उदो-उदो करतो.. अहो, जगात करोडो शोध लागलेत, त्या-त्या राष्ट्रांनी कधी असं केल्याचं मला माझ्या ९२ नंतर झालेल्या जन्मकाळापासून ते आजपर्यंत कधी दिसले नाही… अमेरिकेकडे नासा आहे, आपल्याकडे इसरो… फरक काय… चांद्रयानापर्यंतच आपली मजल आहे की काय??? या देशात असे कित्येक खगोलप्रेमी आहेत, जे नासाचे वैज्ञानिक आतापर्यंत करू शकले नाहित, ते एका झटक्यात करून दाखवतील.. वाढत्या वातावरण बदलामुळे २०२० पर्यंत आपले या धरतीवर जगणे मुश्किल होणार, हे नक्की… जर परग्रहावर जाण्याची परिस्थिती निर्माण झाली तर अमेरिका आपल्याला मदत करेल, याची १ टक्का देखील खात्री नाही… अन आपल्या “इसरो”त तशी ऍबिलिटी अजुन आलेली नाहिये… त्यामुळे येथे पृथ्वीवर तीळ-तीळ मरण्यापेक्षा “यापेक्षा तिसर्‍या महायुद्धात एका झटक्यात मरणं योग्य, असं मला रात्री स्वप्न पडलं, अन तेचमी या पोस्टाला पण टायटल दिलंय….!” 😉 पण हे योग्य होणार नाही, हे मला जरा उशिरा कळालं… 😉 हं, पण त्याकरता आपल्या सर्वांची तयार असायला हवीच… बरं का…

येत्या २०१५ पर्यंत जेवढं कमवता येईल, तेवढं आपण कमावावं, कारण आपल्याकडे आत्ता त्यामानाने बळकट अर्थव्यवस्था आहेच… मग आपणही त्या अमेरिकेच्या लाईनमअध्ये असू, हूकूम गाजवाय्ला….:) प्लिज टेक ईट सिरिएसलि, आय एम नॉट राईट धिस पोस्ट फॉर फन ओन्लि…!!

बाय दि वे, लास्टलि जय महाराष्ट्र टू ऑल…

-आपला विशाल तेलंग्रे

आज म्हणजे दिनांक २० नोव्हेंबर २००९ रोजी कॉलेजमधील व्हायवा (तोंडी परीक्षा) मस्तपैकी संपवून मी ४ वाजता घरी आलो. मी अजुन जरी वयाने लहान असलो तरीही मला इतर विषयांप्रमाणेच बातम्या पाहणेही तेवढेच आवडते. घरी टिव्ही चॅनेलांची मी मांडणी अशी केलीय की त्यात नं. एकला स्टार माझा, नंतर झी २४ तास, आयबीएन लोकमत आणि नंतर इंग्लिश व हिंदी राष्ट्रीय वाहिन्या!

घरी आल्यावर पाहतो तर काय, आयबीएन लोकमतच्या कार्यालयावर तसेच संपादक निखील वागळेंवर हल्ला! शिवसेनेनं केलेल्या या हल्ल्याचा मी दुःखद निषेध करतो कारण त्यांचं मत ते चर्चा करून किंवा त्यांच्या सामना या मुखपत्राद्वारेदेखील मांडू शकले असते, पण त्यांचं कृत्य अतिशय निंदनीय असचं आहे. त्यांनी बहुतेक त्यांची शैली बदलावी असं माझं निष्पक्ष मत आहे.

पण निखील वागळेंचा मी वैयक्तिकरित्या या राज्याचा एक जागृत नागरिक म्हणून निषेध करतो. आपल्याच लोकांविरूद्ध त्यांची जी बोली आहे त्याचं समर्थन मी कधीच करणार नाही. पत्रकार आणि संपादक, एवढा मोठा माणूस जनतेचे प्रश्न मांडण्यापेक्षा नेहमी काही ज्येष्ठ विभूतींवर (जसे की आण्णा हजारे, ज्यांना मी दहावीत असतांना राळेगणसिद्धीत सहलीदरम्यान एक प्रश्न विचारला होता, सचिन तेंडूलकर, बाळासाहेब ठाकरे, अर्थमंत्री तटकरे, आणि इतर काही) त्यांच्या कर्कश व तिखट भाषेत टिका करत असतात. त्यांनी आपल्या तोंडाचा पत्रकाराला शोभेल असाच वापर करावा ही माझी त्यांच्याकडे नम्र विनंती आहे.

मी दहावी शिकल्याच्या नंतरपासून हिटलरचा पुरस्कर्ता आहे. त्याच्याबद्दलच्या वाचनातून मी दोन गोष्टी शिकलोय त्या म्हणजे एक – कोणताही पक्ष कोणत्या कारणांमुळे निवडून येतो ते गुण आपण अंगिकारले पाहिजेत. दोन – ज्याच्याकडे लोकांशी सुसंवाद साधण्याचे सामर्थ्य असते (राजकिय, आर्थिक, किंवा मिडिया), देशाला बूडविण्याचे किंवा तारण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे असतेच.

सर्वात पहिले कोणी प्रतिक्रिया देओ वा ना देओ, मला माझी प्रतिक्रिया मांडण्याचं पुर्ण स्वातंत्र्य आहे. जसं अबु आझमीसारखा (नीच) माणूस माझ्यासारख्याच्या भावना भडकवू शकतो, बहुतेकजणांच्या बाबतीतही तेच घडत असावे. त्या माणसाने अश्या कामांशिवाय कुठलेही देशहिताचे काम केल्याचा संदर्भ मिळणे अशक्य आहे हे तर सर्वांना मान्य असेलच. पण मी आयबीएन लोकमत या वाहिनीचे संपादक निखील वागळे यांचं त्या आझमीसारख्या माणसाशी कम्पॅरिजन करू इच्छित नाही पण त्यांच्या भाषेतील झालेल्या बदलामुळे माझा त्याच्यावरचा रोष वाढलायं. बहुतेक जणांना माझा हा लेख पटणार नाही, पण मी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून पाहतोय की पत्रकारितेचे जे काय स्वातंत्र्य आपण म्हणवतो, त्याचाच गैरवापर या वागळेंनी केलेला माझ्या निदर्शनात आलाय. इंडिया टिव्ही ह्या चॅनेलचा तर मला भयंकर राग येतो, गेल्या ८ महिन्यांपासून आमच्याकडच्या केबलवाल्याने ते चॅनेल काढून टाकलयं ते तरी बरं! पण आयबीएन लोकमत हे निष्पक्ष असण्यावरच माझा विश्वास नाही. औरंगाबादच्या राजेंद्र दर्डा (काँग्रेस) या बिजनेसमन खासदाराचे ते चॅनेल आहे, तेव्हा कसला आला निष्पक्षपणा? इतरही मराठी माध्यमं आहेत, सकाळचे साम मराठी, स्टार माझा, मटा, लोकसत्ता यांसारख्यांकडून वागळे व त्यांच्या चॅनेल टीमने पत्रकारितेचे काही धडे घ्यावेत अशी माझी इच्छा आहे.

आणि माझी शेवटची इच्छा अशीच आहे की इंडिया टिव्हीप्रमाणे निखील वागळेंनी अपशब्द किंवा खालच्या दर्जाच्या भाषेत बोलणं थांबवावं, आणि निर्भिड व निष्पक्ष बातम्या देण्याचं त्यांनी देशाच्या तसेच आपल्या महाराष्ट्राच्या हितासाठी महान काम त्यांनी आजपासून तरी चालू करावं अशी माझी निखील वागळेंकडे विनंती.

काल रात्री मी डिस्कवरी वरील “मॅन vs. वाईल्ड” हा माझा फेवरेट प्रोग्रॅम पाहत होतो. ९:४० वाजता मला एक फोन आला. फोनच्या नंबरची स्टार्टिंग +९१-८०…. अशी होती. तो बहुतेक भारतातूनच असावा असं मला वाटलं, कारण नंबरची सुरूवात +९१ पासून होती. मला वाटलं एखाद्या ऍडचा असेल.  आमच्या घरात “xxx”ची रेंज खुप कमी असते, त्यामूळे तो कॉल रीसीव्ह करण्यासाठी मी बाहेर आलो. कॉल रीसीव्ह करण्याच्या अगोदर आधी घडलेली गोष्ट सांगतो.

एप्रिल २००९ मध्ये २००८ च्या दहावीत असणार्‍या विद्यार्थ्यांचा बोर्डाचा ज्या दिवशी निकाल लागला, त्यावेळी मी मामांच्या गावाकडे होतो. त्यादिवशी काही दहावीत असणार्‍या मित्रांचा निकाल पाहता यावा यासाठी मी माझ्या “xxx”च्या कार्डवर नेट ऍक्सेस करण्यासाठी “xxx” रू./दिवस हा प्लॅन ऍक्टिव्ह केला होता. त्या अगोदरही मी बरेचदा असं केलं होतं. माझा नोकियाचा ३११० क्लासिक हॅंडसेट आहे, ज्यामध्ये कॉम्प्युटरला युएसबी द्वारे मोबाईल मोडेम जोडण्याची सुविधा आहे, त्यामुळे या हॅंडसेटचा मी अगदी दिवाणा आहे. त्या दिवशी सकाळी ११:०० वाजता निकाल नेटवर फ्लॅश होणार होता. त्यामुळे मी बरोबर ११:०० वाजताच तो डेलि इंटरनेट प्लॅन ऍक्टिव्ह केला. मामांकडं सुद्धा लॅपटॉप असल्यामुळे टेन्शनच नव्हतं. त्यादिवशी खुप जणांचे मी पेडे खाल्ले, अबोव्ह ९०% मार्क्स मिळविल्याबद्दल….! अनेकांनी तर पहिल्यांदाच इंटरनेट म्हणजे काय चीज आहे, ते बघितले. रात्री मामांचं क्विक हील अपडेट करून दिलं आणि झोपलो, दुसर्‍या दिवशी औरंगाबादला (मोठ्या) मामांच्या मुलासोबत (मी ज्या मामांकडे होतो ते लहाने मामा, अन मोठे इकडेच औरंगाबादला शेअर ब्रोकर आहेत. सुट्टी असल्यामुळे मोठ्या मामांच्या मुलासोबत मी दरवेळी एन्जॉय करायला गावाकडे जातो. त्याचं नाव गौरव, माझ्यापेक्षा सहा महिन्यांनी मोठा….! आणि त्याचा वाढदिवस पण १५ ऑगस्ट, हाउ लकी ही इज….! :)) पण त्या रात्रीच त्यांच्याकडे किती दिवसांपासून वाट पाहत बसलेला पहिला एवढा जोरदार पाऊस झाला, की आमचा परत येण्याचा प्रोग्रॅम कॅन्सल….! लगेच सकाळी चार वाजता अंघोळी आवरून मळ्यात, सरकी (कपाशी किंवा कापूस) लावायला….! असं कमीत-कमी सगळी पेरणी आवरेपर्यंत चाललं, चार ते पाच दिवस….!

या नांदात ती ऍक्टिव केलेली इंटरनेट सर्व्हिस बंद करायचं विसरलोच होतो मी….! तसं काही बॅलन्स जर बिलो “xxx” रू असेल तर डिडक्शन होत नसे…! औरंगाबादला परत येतेवेळी एस.टी. बसमध्ये गाणे ऐकता-ऐकता मी सहजच मोबाइलमध्ये टाकलेले ओपेरा मिनी हे नेट ब्राउजर उघडून मोबाइल ऑर्कुट उघडून बघितले. त्यावेळी बॅलन्स शुन्य पॉइण्ट काहीतरी एवढे होते. मला माहित होते की पेज ऊघडणार नाही म्हणून…! पण काय माहित पेज उघडले देखिल क्षणार्धात….! लगेच मी बॅलन्स चेक केलं, तेवढचं….! काय आश्चर्य, अजुन काही पीसी-साइट्स उघडून बघितल्या, सटासट पेजेस ऊघडत गेले….! मी तर जाम खु्श्श झालो, गौरवला सांगितले, तो पण खुश झाला….! बस्स, आता बसमध्ये नुसतं याचे-त्याचे ऑर्कुट प्रोफाइल्स पाहण्याचा खेळ चालू झाला, संपला तो मोबाइलची बॅटरी उतरेपर्यंत………! 🙂 ते नेट मी अजुनही फ्री युज करतोय आजपर्यंत….(पुढे भविष्यात काय होईल ते सांगता येत नाही.). एक दोन वेळेस मी मित्रांनी सांगितल्यावर ती सेवा बंद करण्यासाठी मेसेजेस (SMSs) देखील पाठविले, पण जैसे थे…..!

तर मी सांगत होतो, की काल रात्री मला एक अनोळखी कॉल आला, वर सांगितल्याप्रमाणे…

झालेलं संभाषण पहा:

मी: हेलो s s.., कोण?
तिकडून: हैलो, क्या आप मी. विशाल है..?(एखादा युपी माणूस बोलत आहे बहुतेक, असे जाणवले आणि त्यानंतर लगेच आवाज एकदम बंद..!)
मी: हम्म…, तुम्ही कोण…? (भरल्या आवाजात… कारण मला कळून चुकले होते की ते नक्कीच कॉल सेंटर मधले आहे..!)
तिकडून: मतलब?
मी: व्हू आर यू…?
तिकडून: मैं, मैं “xxx” कस्टमर केअर से बोल रहा हूं, सरजी आपका तो बॅंड बज गया है…! क्या आप फ्री नेट युज कर रहे हैं..? (दबक्या हसर्‍या आवाजात…)
मी: हां, देन..? (जरा घाबरलो होतो…)
तिकडून: मी. विशाल, आपको पुरे पांच सौ रू. भरने पडेंगे…! (अजुन दबक्या हसर्‍या आवाजात…)
मी: क्या….? (आता तर जाम घाबरलो होतो, गच्चीवर गेलो, घरात कोणाला ऐकू येऊ नये म्हणून..)
तिकडून: हमने आपके घर का पता भी ढूंढ लिया है, और हमारे लोग आपके घर कभी भी आ सकते हैं… आप तो गये, मी. विशाल…! (आता त्या माणसाचं हसणं एकदम वाढलं…)
मी: (वामल्यासारखा आवाजात, काहीच बोलता येत नव्हते…)
तिकडून: (तरी पण १ मिनीट तो हसतच होता..अन मी त्याच्या पुढच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होतो.)

नंतर थोड्या वेळाने,

तिकडून: अरे विशाल, मी आहे दिपक, दिपक….!
मी: (मी माझ्याच धुंदीत, आणि नंतर त्याचं बोलणं नीट ऐकल्यावर कळालं, अरे यार हा तर दिपक, माझा मित्र….! 🙂 )
तिकडून: करे, 2#$&8$!*#, तुला माझा आवाज कळाला नाही का…?
मी: (रडतच…), नाही…! (अन त्यानंतर दोन- तीन शिव्या दिल्या त्याला…प्रेमळ..! :))
तिकडून(दिपक): हा…हा…हा…! अरे नविन कार्ड आलयं, टाटाचं, त्याची स्टार्टिंग ८० पासून आहे….! तेरा नेट लाईफटाईम फ्री हैं, 2#$&8$!*#…..!

आता तर मी जाम भडकलो, त्याच्यावर, लगेच फोन ठेवून दिला. आणि रात्र बिगर झोपीची काढली….! 😦

(“xxx” हे मी माझ्या सिक्युरिटीसाठी केलयं….! 🙂 )

दारात फुले झेंडूची,

लूट करा आज सोन्याची,

तुमच्या जीवनी धारा वाहू दे हर्षाची,

ही एकच शुभेच्छा दसर्‍याची…..!

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...!

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...!

नवीन संकेतस्थळ

लेखकाचे नवीन संकेतस्थळ आपण खालील पत्त्यावर पाहू शकता:
http://vishaltelangre.com/

कळत नकळत वरील पृष्ठे

आर्काईव्ह्ज

RSS माझी दुसरी अनुदिनी “सुरूवात…”

 • वेळेचे नियोजन
  हं, तर नवीन वर्षाला सुरुवात झालीय म्हणायची. गेल्या दशकात अशा कित्येक महत्वपूर्ण घटना तुमच्या आयुष्यात घडून गेल्या असतील ज्यांमध्ये तुमचा राहिलेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग तुम्ही हयात असेपर्यंत कधीच विसरु शकणार नाहीत. बहुतेकदा अशा घटनांच्या परिणामांचे स्वरुप—प्रचंड आनंद, रंगतंद्रीमय सुखातिरेक, भयानक, पार दुःखाच्या डोहात बुडल्याची जाणीव, भावशून्यता, नैराश्य […]
 • मागे वळून पाहताना...
  मागे वळून पाहताना...आत्ता सहजच या वर्षाच्या सुरुवातीला लिहिलेला "नवीन वर्ष - माझं रिझोल्युशन" हा लेख वाचला. किती व्यंगात्मक अन् बालिश वृत्ती असणारा लेख आहे तो, जाऽम हसलो, वाचणार्‍यांचे काय हाल झाले असतील, त्यांचे तेच जाणो, असो. झालं, विचार करायला नवीन विषय मिळाला अन् लागोलाग डोक्यात गेल्या काळातील अनेक घटना पडद्यावर एकापाठोपाठ चलचित्रे उमटावीत त्या […]
 • त्याग
  ही वाट दूर जाते...     पूर्वी त्याला सहजीवनाची तर सोडाच पण अगदी आप्तांमधल्या जन्मजात जुळलेल्या नात्यांची सुद्धा जाणीव नव्हती किंवा त्या नात्यांमध्ये स्वतःला गुंफून घेण्यासही तो कधी तयार होत नसे. "लाइफ इज सोऽ लॉन्ग..." अशी त्याची जीवनाबद्दलची भावना बनलेली होती. कौटुंबिक नि नैतिक हितसंबंध जपणे देखील त्याला जड जाई, अशा वेळी त्याची नेहमी पलायनाचीच भूमि […]
 • विचित्र स्वप्नानुभव
       किती अफाट हे वाळवंट... जिकडे नजर टाकावी, तिकडे वाळूचे उंचच-उंच डोंगर... गेल्या दोन-तीन तासांपासून मी सलग, कुठेही न वळता चालतोय... वर तळपता सूर्य, तहानेने अगदी व्याकूळ झालोय... व्याकूळ म्हणजे कंठ एखाद्या दुष्काळग्रस्त झर्‍याप्रमाणे कोरडा पडलाय, अगदी दयनीय अवस्था... ओसाड, पडीक, वाट नसलेल्या वाळवंटामधून वाट काढत मी चालतोच आहे. मी इथे का, कसा, व नेमका कशासा […]
 • यस्सऽ नोऽ...
  [डिस्क्लेमर: पुढील कथानकातील कुठल्याही प्रसंगाचा/पात्राचा/स्थळाचा/वचनांचा कशाशीही कसलाही संबंध नाहीये. यातील "मी" हे पात्र देखील काल्पनिक आहे. कसल्याही बाबतील जर तुम्हाला हे तुमच्याशी घडलेल्या घटनेशी संबंधित आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा.]    पहिलंच लेक्चर... तसं सगळेच लेक्चर्स आम्ही म्हशीसारखे उदास मुस्कटं करुन कसे-बसे मार्गी लावत असतो, कुठलंह […]

हीट काउंटर!

 • 29,871 वेळा ही अनुदिनी पाहिली गेली!

सध्या मी काय करतोय?

किती जण लाइनवर आहेत…

ब्लॉग विश्व !

मी येथे आहे…!

येथेही जरूर भेट द्या:

Page copy protected against web site content infringement by Copyscape