कळत नकळत

यापेक्षा तिसरे महायुद्ध परवडेल…

Posted by: विशाल तेलंग्रे on: डिसेंबर 17, 2009

कित्येक दिवसांपासून चालू असलेली “कोप टू होप” अश्या प्रकारची जाहीरात बहुतेक जणांनी टिव्हीवर पाहिली असेल. पहिले-पहिले तर मला या जाहिरातीचा नेमका अर्थच कळत नव्हता. पण एकदा १५ दिवसांपूर्वी सहजच याहू वरील न्युज वाचत होतो, तेव्हा कुठे मला कळालं की नेमकं काय प्रकरण आहे ते…

तुम्हाला मालदीवने समुद्रामध्ये तर नेपाळने माउंट एव्हरेस्टवर घेतलेली कॅबिनेटची बैठक आठवत असेल ना… हं, त्याच्याशीच या प्रकरणाचा संबंध आहे… आपण प्रत्येकजण दहावीपर्यंतच्या शैक्षणिक वर्षांमध्ये हरितगृह परिणाम, ग्लोबल वार्मिंग यासारखे विषय शिकलेलो आहोतच… पण त्याचा कधीच खोलात जाऊन अभ्यास केला नसणार, हं काही निसर्गप्रेमींना वगळून बरं… तुम्हाला माहिती आहे का, १९व्या शतकाच्या शेवटच्या दशकांत जेव्हा वाफेवरच चालणारे पहिले इंजिन तयार केले गेले होते, त्याचापासून निघालेल्या धूरातील कार्बनचे अस्तित्व आजही पृथ्वीच्या वातावरणात आहे! याचा सरळ-सरळ अर्थ तर असाच होतो ना की, औद्योगिक क्रांतीला जेव्हापासून सुरूवात झाली होती, त्यामुळे झालेल्या वायू प्रदुषणाचे दुष्परिणाम आज आपण भोगतो आहोत.. तर मग आज आपण ज्या २०व्या शतकात जगतोय, आपण केलेले प्रदुषण १९व्या शतकाच्या तुलनेने कितीतरी अधिक पटीने जास्तआहे, त्याचा येत्या काही वर्षांत, म्हणजेच सन २०२० पर्यंत काय परिणाम होईल, याचा कोणी विचार केला का…??

कोपनहेगेन (त्यासंबंधित ऑफिशियल वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.) मध्ये ७ ते १८ डिसेंबर या कालावधीत संयुक्त राष्ट्र संघटनेने (’युनो’ने) “जागतिक हवामान बदल” या महत्वाच्या मु्द्यावर एक चर्चासत्र आयोजित केलेले आहे, आज दिनांक १७ डिसेंबर, अन उद्या या चर्चासत्राचा शेवटचा दिवस.. गेल्या दोन आठवड्यांमध्ये या चर्चेत १०० ते १५० राष्ट्रे सहभागी झाली. पण दुसर्‍या महायुद्धाबद्दल कोणाला माहीती आहे का? जी राष्ट्रे जित (आय मीन पराजित) झालेली आहेत, आणि जी पारतंत्र्यात आहेत किंवा कर्जबाजारी झालेली आहेत, अशा राष्ट्रांनी, त्यावेळी मित्र राष्ट्रांनी म्हणजेच जेत्यांनी तयार केलेल्या “संयुक्त राष्ट्रे” या जागतिक दर्जाच्या संघटनेत सामिल व्हावे, व जेते मंडळी जे काय निर्णय घेतील ते त्या राष्ट्रांनी निमूटपणे मान्य करावेत… त्यावेळी सर्वात महत्वाची गोष्ट होती म्हणजे की दोस्त राष्ट्र पक्षातील एकही राष्ट्र त्यावेळी या संयुक्त राष्ट्र संघटनेत सामील नव्हते…!! ही आहे  या “संयुक्त राष्ट्र ” संघटनेची ऐतिहासिक पार्श्चभूमी… आज तरी ती राष्ट्रे या संघटनेची सदस्ये आहेत का नाही, एवढंच मला फक्त माहित नाहिये… यावरून आपल्याला एवढं तर निश्चितच कळलं असेल की “युनो” ही अमेरिका आणि इतर दोस्त राष्ट्रे किंवा “बड्या” राष्ट्रांच्या हातातील एक बाहूली आहे, ज्याद्वारेच त्यांनी आपल्यासारख्यांना लूबाडून स्वतःला विकसित बनवून घेतले आहे, आणि आपण शेवटपर्यंत असंच विकसनशील रहावं हा त्यांचा मानस असावा. म्हणूनच काय मला बहुतेक वाटतंय की देशावर ज्या घाता-पाताच्या घटना वाढताहेत, त्यामागे नक्कीच त्यांचाच हात असावा. सबळ कारणही तसेच आहे, त्यांच्याएवढा फायदा ना पाकिस्तानला होणारा आहे ना की दुसर्‍या एखाद्या राष्ट्राला….??? अन मी मध्यंतरी असं देखील ऐकलं होतं की, आताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी “ओसामा बीन लादेन ” याने १९६०-७० दरम्यान अमेरिका आणि रशिया ह्या दोन बड्या महासत्ताध्ये चाललेल्या शीत-यु्द्धामध्ये अमेरिकेला मदत केली होती म्हणून…!! विचार करण्यासारखी गोष्ट आहे…!!

आता जी कोपनहेगेनला कॉन्फरन्स चालू आहे, ती निष्फळ होणं, हे तर साहजिक आहेच.. बड्या राष्ट्रांचा दबाव, त्यांनी केलेल्या गुप्त करारामुळे होणारी छोट्या राष्ट्रांची गोची अशी बरीच उघड कारणे आहेत.. बाय दि वे, आपण ह्या गोष्टींपासून काही तरी बोध नक्कीच घ्यायला हवा..

आर्यभट्टाने पृथ्वी गोल आहे असं सांगणार्‍या कोपर्निकसच्या (माझ्या माहितीप्रमाणे, पश्चिमेत ही गोष्ट प्रथम “आरिस्टार्कस” या खगोलवैज्ञानिकाने सांगितली होती, पण त्याचं कुठं नाव देखील ऐकण्यात येत नाही, जा द्या, हे मॅटर या पोस्टशी निगाडित नाही, मी चुकीने जरा खोलात शिरलो होतो… ;) ) जन्माच्या अगोदरच ती गोष्ट सांगितली होती, त्या गोष्टीचा आपण उदो-उदो करतो.. अहो, जगात करोडो शोध लागलेत, त्या-त्या राष्ट्रांनी कधी असं केल्याचं मला माझ्या ९२ नंतर झालेल्या जन्मकाळापासून ते आजपर्यंत कधी दिसले नाही… अमेरिकेकडे नासा आहे, आपल्याकडे इसरो… फरक काय… चांद्रयानापर्यंतच आपली मजल आहे की काय??? या देशात असे कित्येक खगोलप्रेमी आहेत, जे नासाचे वैज्ञानिक आतापर्यंत करू शकले नाहित, ते एका झटक्यात करून दाखवतील.. वाढत्या वातावरण बदलामुळे २०२० पर्यंत आपले या धरतीवर जगणे मुश्किल होणार, हे नक्की… जर परग्रहावर जाण्याची परिस्थिती निर्माण झाली तर अमेरिका आपल्याला मदत करेल, याची १ टक्का देखील खात्री नाही… अन आपल्या “इसरो”त तशी ऍबिलिटी अजुन आलेली नाहिये… त्यामुळे येथे पृथ्वीवर तीळ-तीळ मरण्यापेक्षा “यापेक्षा तिसर्‍या महायुद्धात एका झटक्यात मरणं योग्य, असं मला रात्री स्वप्न पडलं, अन तेचमी या पोस्टाला पण टायटल दिलंय….!” ;) पण हे योग्य होणार नाही, हे मला जरा उशिरा कळालं… ;) हं, पण त्याकरता आपल्या सर्वांची तयार असायला हवीच… बरं का…

येत्या २०१५ पर्यंत जेवढं कमवता येईल, तेवढं आपण कमावावं, कारण आपल्याकडे आत्ता त्यामानाने बळकट अर्थव्यवस्था आहेच… मग आपणही त्या अमेरिकेच्या लाईनमअध्ये असू, हूकूम गाजवाय्ला….:) प्लिज टेक ईट सिरिएसलि, आय एम नॉट राईट धिस पोस्ट फॉर फन ओन्लि…!!

बाय दि वे, लास्टलि जय महाराष्ट्र टू ऑल…

-आपला विशाल तेलंग्रे

5 प्रतिसाद to "यापेक्षा तिसरे महायुद्ध परवडेल…"

Request all of us
Many birds die in Summer without Water
SAVE THEM
Plz. put Water Pots for thirsty Birds at Balcony, Windo side, tarace, home Garden etc.
It is free
ok
PRAMOD GIRADKAR
WARDHA

विशाल,
तुझी पर्यावरण संबंधी कळकळ जाणवली. पोट तिडीकेने हे लिहिलस हे पण माझ्या पर्यंत पोहचलं. आपण हताश होवून समस्या संपणार नाहीत. पुढच्या पिढीला सुजलाम सुफलाम पृथ्वी आपण पुन्हा एकदासोपावली पाहिजे. त्याकरता प्रयत्न चालूच ठेवणे आवश्यक आहेत. तिसरे महायुद्ध अधिक भयावह असणार. त्यापेक्षा सुंदर जगण्याचे प्रयत्न अधिक चांगले. अर्थात तुझे पोस्ट ला असे नाव देण्याची मानसिक कळकळ व त्यासाठी चिडीची भावना त्या वेळी अशीच असणार पण तूच लिहिलेस न, संपणे म्हणजे उपाय नाही तर जीवन जगणे त्यासाठी प्रयत्न हे करावयास हवेच.

विस्तृत अभिप्रायाबद्दल आभार अनुजा ताई…

“प्रयत्नांती परमेश्वर” असं म्हणतात.. फळ काहीही मिळो, पण यातून जो मानसिक आनंद मिळतोय, तो नक्कीच आतापर्यंत अनभवलेला सर्वोच्च असाच आहे.. माझे असले थोडे का होईना, योगदान असेच पुढेही चालू राहील…

इतकी घाई करू नकोस…
आपण म्हातारे होऊन मरेपर्यंत तरी पृथ्वीला काही होत नाही…

मला हे जरा उशिरा कळलं…. ;) बाय द वे, थॅंक्स फॉर कमेन्टिंग….

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

नवीन संकेतस्थळ

लेखकाचे नवीन संकेतस्थळ आपण खालील पत्त्यावर पाहू शकता:
http://vishaltelangre.com/

कळत नकळत वरील पृष्ठे

आर्काईव्ह्ज

RSS माझी दुसरी अनुदिनी “सुरूवात…”

  • वेळेचे नियोजन
  • मागे वळून पाहताना...
    मागे वळून पाहताना...आत्ता सहजच या वर्षाच्या सुरुवातीला लिहिलेला "नवीन वर्ष - माझं रिझोल्युशन" हा लेख वाचला. किती व्यंगात्मक अन् बालिश वृत्ती असणारा लेख आहे तो, जाऽम हसलो, वाचणार्‍यांचे काय हाल झाले असतील, त्यांचे तेच जाणो, असो. झालं, विचार करायला नवीन विषय मिळाला अन् लागोलाग डोक्यात गेल्या काळातील अनेक घटना पडद्यावर एकापाठोपाठ चलचित्रे उमटावीत त्या […]
  • त्याग
  • विचित्र स्वप्नानुभव
  • यस्सऽ नोऽ...

हीट काउंटर!

  • 25,009 वेळा ही अनुदिनी पाहिली गेली!

सध्या मी काय करतोय?

किती जण लाइनवर आहेत…

ब्लॉग विश्व !

मी येथे आहे…!

येथेही जरूर भेट द्या:

Page copy protected against web site content infringement by Copyscape

Follow

Get every new post delivered to your Inbox.