Posted by: विशाल तेलंग्रे on: नोव्हेंबर 20, 2009
आज म्हणजे दिनांक २० नोव्हेंबर २००९ रोजी कॉलेजमधील व्हायवा (तोंडी परीक्षा) मस्तपैकी संपवून मी ४ वाजता घरी आलो. मी अजुन जरी वयाने लहान असलो तरीही मला इतर विषयांप्रमाणेच बातम्या पाहणेही तेवढेच आवडते. घरी टिव्ही चॅनेलांची मी मांडणी अशी केलीय की त्यात नं. एकला स्टार माझा, नंतर झी २४ तास, आयबीएन लोकमत आणि नंतर इंग्लिश व हिंदी राष्ट्रीय वाहिन्या!
घरी आल्यावर पाहतो तर काय, आयबीएन लोकमतच्या कार्यालयावर तसेच संपादक निखील वागळेंवर हल्ला! शिवसेनेनं केलेल्या या हल्ल्याचा मी दुःखद निषेध करतो कारण त्यांचं मत ते चर्चा करून किंवा त्यांच्या सामना या मुखपत्राद्वारेदेखील मांडू शकले असते, पण त्यांचं कृत्य अतिशय निंदनीय असचं आहे. त्यांनी बहुतेक त्यांची शैली बदलावी असं माझं निष्पक्ष मत आहे.
पण निखील वागळेंचा मी वैयक्तिकरित्या या राज्याचा एक जागृत नागरिक म्हणून निषेध करतो. आपल्याच लोकांविरूद्ध त्यांची जी बोली आहे त्याचं समर्थन मी कधीच करणार नाही. पत्रकार आणि संपादक, एवढा मोठा माणूस जनतेचे प्रश्न मांडण्यापेक्षा नेहमी काही ज्येष्ठ विभूतींवर (जसे की आण्णा हजारे, ज्यांना मी दहावीत असतांना राळेगणसिद्धीत सहलीदरम्यान एक प्रश्न विचारला होता, सचिन तेंडूलकर, बाळासाहेब ठाकरे, अर्थमंत्री तटकरे, आणि इतर काही) त्यांच्या कर्कश व तिखट भाषेत टिका करत असतात. त्यांनी आपल्या तोंडाचा पत्रकाराला शोभेल असाच वापर करावा ही माझी त्यांच्याकडे नम्र विनंती आहे.
मी दहावी शिकल्याच्या नंतरपासून हिटलरचा पुरस्कर्ता आहे. त्याच्याबद्दलच्या वाचनातून मी दोन गोष्टी शिकलोय त्या म्हणजे एक – कोणताही पक्ष कोणत्या कारणांमुळे निवडून येतो ते गुण आपण अंगिकारले पाहिजेत. दोन – ज्याच्याकडे लोकांशी सुसंवाद साधण्याचे सामर्थ्य असते (राजकिय, आर्थिक, किंवा मिडिया), देशाला बूडविण्याचे किंवा तारण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे असतेच.
सर्वात पहिले कोणी प्रतिक्रिया देओ वा ना देओ, मला माझी प्रतिक्रिया मांडण्याचं पुर्ण स्वातंत्र्य आहे. जसं अबु आझमीसारखा (नीच) माणूस माझ्यासारख्याच्या भावना भडकवू शकतो, बहुतेकजणांच्या बाबतीतही तेच घडत असावे. त्या माणसाने अश्या कामांशिवाय कुठलेही देशहिताचे काम केल्याचा संदर्भ मिळणे अशक्य आहे हे तर सर्वांना मान्य असेलच. पण मी आयबीएन लोकमत या वाहिनीचे संपादक निखील वागळे यांचं त्या आझमीसारख्या माणसाशी कम्पॅरिजन करू इच्छित नाही पण त्यांच्या भाषेतील झालेल्या बदलामुळे माझा त्याच्यावरचा रोष वाढलायं. बहुतेक जणांना माझा हा लेख पटणार नाही, पण मी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून पाहतोय की पत्रकारितेचे जे काय स्वातंत्र्य आपण म्हणवतो, त्याचाच गैरवापर या वागळेंनी केलेला माझ्या निदर्शनात आलाय. इंडिया टिव्ही ह्या चॅनेलचा तर मला भयंकर राग येतो, गेल्या ८ महिन्यांपासून आमच्याकडच्या केबलवाल्याने ते चॅनेल काढून टाकलयं ते तरी बरं! पण आयबीएन लोकमत हे निष्पक्ष असण्यावरच माझा विश्वास नाही. औरंगाबादच्या राजेंद्र दर्डा (काँग्रेस) या बिजनेसमन खासदाराचे ते चॅनेल आहे, तेव्हा कसला आला निष्पक्षपणा? इतरही मराठी माध्यमं आहेत, सकाळचे साम मराठी, स्टार माझा, मटा, लोकसत्ता यांसारख्यांकडून वागळे व त्यांच्या चॅनेल टीमने पत्रकारितेचे काही धडे घ्यावेत अशी माझी इच्छा आहे.
आणि माझी शेवटची इच्छा अशीच आहे की इंडिया टिव्हीप्रमाणे निखील वागळेंनी अपशब्द किंवा खालच्या दर्जाच्या भाषेत बोलणं थांबवावं, आणि निर्भिड व निष्पक्ष बातम्या देण्याचं त्यांनी देशाच्या तसेच आपल्या महाराष्ट्राच्या हितासाठी महान काम त्यांनी आजपासून तरी चालू करावं अशी माझी निखील वागळेंकडे विनंती.
Mi वागळेंवर माझीही एक प्रतिक्रिया ya bolg che purna samarthan karto … kay Journalist aase aasatat ka ???
he aachach chlayacha.
VAGLE HE DUSARYANNA BOLUCH DET NAHIT. MAT BOLAVATAT KASHYALA? AARDA ORDAKARUN BOLANE.SWATA MOTHA SHAHANA V DUSARE SARV MURKH ASE VAGALE YANCHE VAGANE AAHE.
हाय विशाल,
मला पण संपादक निखील वागळेंवर, असेच काही मत आहे. कोणीही सांगू शकतो हया पत्रकार चा प्रश्न विचारनया मागे कल काय असतो.
राज अलगुड़े
निर्भिड आणि नि:पक्षपातीपणे बातम्या देणे आणी समोरच्याला अपमान झाल्यासारखं बोलणे यात फरक असतो, हे अजून वागळेंना शिकायचंय. त्यांच्या कार्यक्रमात तेच नेत्यांना बोलावतात आणि हल्ला केल्यासारखं मोठ्या आवाजात प्रश्न विचारतात. बोलीभाषेत बोलताना त्यांना निकृष्ट दर्जाचे शब्द वापरून बोलताना कोणतं समाधान मिळतं हे समजलेलं नाही.
पत्रकारांवर काय, कुणावरही हल्ला होणे हीच निंद्यनीय गोष्ट आहे. मात्र, हल्ल्यामागची पार्श्वभूमी काय सांगते हेही पाहिलं पाहिजे. सध्या प्रसारमाध्यमं भान सोडूनच वागत आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारातील असमंजसपणा त्यांना भोवतो आहे. विचारांतील आक्रमकतेला, कृतीतील आक्रमकतेची ही प्रतिक्रिया आहे.
धन्यवाद ताई
फेब्रुवारी 21, 2011 at 5:35 pm
sagle xxxxxx sarkach.